पंढरपुरात माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराडच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन
---------------------------------------------------------------------------

मुख्य आरोपी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटकेची जोरदार मागणी
माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधवाकडून अरे मुंडे - कराड हाँय हाँय अशी जोरदार घोषणाबाजी केली.
माजी मंत्री धनंजय मुंडे , वाल्मीक कराड च्यासह चौघां च्या प्रतिमेस उग्र चप्पल मारो आंदोलन केले.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर :-( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्यासाठी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधवाकडून तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, विष्णू चाटे ,सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे ,कृष्णा आंधळे यांच्या प्रतिकात्मक पुतळे तयार करून त्यांना फासावर लटकवण्यात आल्याचे चित्र तयार करण्यात आले होते त्याच्या चेहऱ्यावर सकल मराठा समाज बांधवाकडून चप्पलने मारून प्रतिमेवर थूंकून चौघांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करून आरोपींना तात्काळ अशी द्यावी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी व आरोपीला फाशी देऊन त्यांचे पंढरपुरातील सार्वजनिक मुतारी मध्ये पोस्टर चिटकवून निषेध करण्यात आला. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची भर दुपारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्या निषेधार्थ आज सकाळी 11 वा .पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाकडून सरपंच संतोष देशमुख यांचा खून खटला फास्टट्रॅक मध्ये कोर्टामध्ये पाठवला जावा संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था प्रचंड ढासळली आहे याला सरकार जबाबदार आहे अशी टीका यावेळी सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे ,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाच्या प्रकरणामुळे सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणाम सरकार जबाबदार राहील तसेच सरकारच्या विरोधात व माजी मंत्री धनंजय मुंडे ,कराड चार साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे असा इशारा देण्यात आला. यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा राष्ट्वादीचे नेते वसंत नाना देशमुख, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, उपनगराध्यक्ष नागेश भोसले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव ,सूर्योदय परिवाराचे प्रमुख नितीन शेळके, शाहू आप्पा मोडक, नगरसेवक प्रशांत शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, धनंजय मोरे, ओम कदम ,महेश पवार, जगदीश पवार ,रामभाऊ गायकवाड, संतोष गुंजारी, प्रशांत सुरवसे, अमोल आटकळे, नागेश जाधव ,आकाश पवार ,नाना शिंदे, अनिता पवार ,तात्या जगताप, विकी झेंड यांच्यासह सकल मराठा समाजातील हजारो बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासह तगडा बंदोबस्त ठेवला होता.