◼️मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाच्या निषेधार्थ पंढरपुरात दि.६ रोजी जाहीर निषेध व तीव्र आंदोलन, ◼️सकल मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

◼️मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाच्या निषेधार्थ पंढरपुरात दि.६ रोजी जाहीर निषेध व  तीव्र आंदोलन,  ◼️सकल मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दैनिक ,पंढरी नगरी न्यूज) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दि .9 डिसेंबर 2024 रोजी भर दुपारी अपहरण करून हत्या झाली क्रूर हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करण्यात यावे व त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, 85 दिवसापासून संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आहे. सीआयडीच्या दोषारोपत्रात काही फोटो व्हिडिओ जोडले आहेत हेच फोटो सोमवारी व्हायरल झाले आणि त्यावर राग व रोष व्यक्त होऊ लागला. यामध्ये संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारत असताना हसताना तोंडावर लघु शंका करतानाचे दिसत आहे याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत याचाच भाग म्हणून पंढरपूर येथे या मागणीसाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा बांधवाच्या वतीने गुरुवार दिनांक 6 रोजी निषेध मोर्चा व तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने देण्यात आली. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूना मधील मुख्य सूत्रधार पोलिसांनी शोधून काढावा व मारेकऱ्याना फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांचा खून खटला फास्टट्रॅक मध्ये चालवावा इत्यादी मागण्याच्या निषेधार्थ तसेच मास्टर माईंड धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी निषेध आंदोलन.

उद्या दि .६ मार्च २०२५ रोजी

सकाळी १०:३० वा. 

ठिकाण:- छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकल मराठा समाज पंढरपूर