बार्शी कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये विभागीय निमंत्रित पुरुष गटाच्या खो-खो स्पर्धाचे आयोजन...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दैनिक पंढरी नगरी न्युज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे दि. २ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत विभागीय निमंत्रित पुरुष गट खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ . एस एस गोरे यांनी दिली.
या स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी मान्यता दिली आहे. या स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातील एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये २१०००/, द्वितीय क्रमांकास रुपये १५०००/ व तृतीय क्रमांकास रुपये ११०००/ रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.