गावात दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षालाच गाव गुंडाकडून दमदाटी , शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी..गावातील वातावरण गंभीर, पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, पोलीस खात्याविषयी याबाबत नागरिकांतून तीव्र संताप , संबंधित आरोपी विरुद्ध शिवीगाळ प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(, दै.पंढरी नगरी न्यूज) गावातील अवैध दारू विक्रीमुळे कंटाळलेल्या महिला आणि तंटामुक्ती अध्यक्षांनी गावात दारूबंदीसाठी ठराव करून प्रशासनाला निवेदनही दिले. मात्र हे न बघवणाऱ्या गावगुंडांने 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच तंटामुक्ती अध्यक्षाला शिवीगाळ करून दमदाटी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे. याबाबत गावातील महिलांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांमार्फत दारूबंदीचा ठराव करून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी करकंब पोलीस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना. निवेदन दिले आहेत. तरीही गावात अवैध दारू विक्री सुरूच आहे.
मात्र 26 जानेवारी रोजी ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय जवळ आलेली तंटामुक्तीचे अध्यक्ष बंडू पवार यांना आरोपी हेमंत मारुती पवार याने, दारूबंदी साठी ग्रामसभेचा ठराव घ्यायचा नाही, अशी म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत करकंब पोलीस ठाण्यामध्ये हेमंत मारुती पवार (रा. खेडभोसे) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा गावातील महिला आणि ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या गावगुंडाविरुद्ध कडक कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.