दीपावली नरकचतुर्दशी २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान, विठ्ठल भक्ताने साकारली आकर्षक रांगोळी.

दीपावली नरकचतुर्दशी २०२४ निमित्त श्री विठ्ठलास  व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान,  विठ्ठल भक्ताने  साकारली आकर्षक रांगोळी.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज नरकचतुर्दशी निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट , कौस्तुभ मणी, दंडपेठया, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मोत्याची कंठी, शिरपेच, मोहरांची माळ, तुळशीची माळ, तोडे जोड, मत्स्य जोड, पदकासह लॉकेट इ.

श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच श्री.राधिका मातेस चांदीचा मुकुट, पुतळ्यांची माळ, मोत्याचा कंठा, ठुशी नवीन व श्री. सत्यभामा मातेस चांदीचा मुकुट, जाडवाचे बाजूबंद जोड, चिंचपेटी हिरवी, जडावाचा हार, पुतळ्यांची माळ, ठुशी नवीन, मण्या मोत्याच्या पटल्या जोड, मोत्याचा कंठा मोठा, नथ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच आज नरकचतुर्दशी निमित्ताने श्री.विठ्ठल सभा मंडप येथे श्री.नंदू शिंदे, मुंबई यांनी श्री.विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.