मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासन तत्पर - सचिन इथापे खेडभोसे ग्रामस्थांनी केला महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) "ज्यांच्या पूर्वजांची नावे मोडी किंवा मराठी भाषेत कुणबी म्हणून आलेली आहेत, त्यांच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावे, प्रशासनाच्या वतीने त्यांना तत्परतेने प्रमाणपत्र दिले जाईल, असे अभिवचन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिले.

खेड भोसे गावातील 249 कुणबी नोंदी सापडल्या होत्या. या नोंदी शोधण्यासाठी आणि त्यासंबंधितांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तत्परता दाखवण्यात आली, त्यामुळेच खेडभोसे गावातील सुमारे 195 ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.

प्रशासनाच्या या तत्परतेमुळेच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले याची जाणीव ठेऊन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी आज खेडभोसे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गावंधरे यांचा सत्कार केला.
यावेळी पूढारी पत्रकार आणांसो पवार ,ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, विकास पवार शहाजी जमदाडे, माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार ,सकल मराठा समाज सन्मवय बंडू पवार, नागनाथ जमदाडे, गणेश जमदाडे जमदाडे, कूषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर अरूण नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.