शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबिर संपन्न...

शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबिर संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव ता. पंढरपूर येथील लहान विद्यार्थ्यांनचे दंत तपासणी शिबिर संपन्न झाले. पंढरपूर येथील सुप्रसिद्ध मोरया क्लिनिक यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी डॉ .प्रियांका आप्पासाहेब जरे व डॉ. अनुराधा खंडागळे यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून योग्य ती काळजी घेण्याची सूचना दिली. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे दाताचे प्रॉब्लेम आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुढील उपचार घेण्याची सूचना त्यांनी दिली .दाताचे महत्त्व आणि त्याविषयी काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती यावेळी त्यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सहशिक्षक वर्षा मोरे ,शितल बागल, लिना बागल, शीतल मस्के, सिमा रकटे, राजेंद्र मोलाणे,मसरुद्दीन पटेल,अजय मोरे, संतोष पवार, नियाज मुलाणी, शितल मस्के, दिपक देशमुख, सोमनाथ भूईटे व विद्यार्थी उपस्थित होते.