संत तुकाराम महाराज पादुकाची पूजन मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते संपन्न...
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळा यात्रेचे सांगता झाल्यानंतर आषाढ शु १५ रविवार दि.२१/०७/२०२४ रोजी पोर्णीमेचे दिवशी श्री जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची गोपाळकाल्यानंतर परतीच्या प्रवासाआगेदर श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या भेटी साठी श्री विठ्ठल मंदिरात आल्या नंतर संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पुजन करण्यात आले.

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व भेटीवेळी संस्थानचे पदाधिकारी व मंदिरे समिती कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.