प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

________________________________________________

                   पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना वेग
-----------------------------------------------------------------------------------दैनिक पंढरी नगरी न्युज चॅनेल चा अंदाज तंतोतंत खरा ठरला
-----------------------------------------------------------------------------------

सोलापूर (प्रतिनिधी ):- सोलापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम मुक्ताई जाहीर करण्यात आला .या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डी एस भवर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

त्याप्रमाणे २१ रोजी मतदान होणार आहे .तर २२ रोजी मतमोजणी असा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिक्षक संघ व शिक्षक समितीच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये हालचालीला वेग आला आहे.

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही शिक्षकांची सहकारी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बँक समजली जाते. शिक्षक संघ व शिक्षक समिती यांच्यामध्ये होणारी पारंपरिक लढत ही जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये राजकीय उत्सुकतेचा आणि प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे .पतसंस्थेच्या राजकारणामध्ये अजूनही काही गट संघटना सक्रिय झाल्या असून त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पॅनलचाही पर्याय देण्याचे हालचाली सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे .सध्या या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सत्ताधारी शिक्षक संघाचे वर्चस्व आहे.