करकंब आदर्श प्रशालेच्या तेजश्री व तृप्ती नागणे या जुळ्या बहिणीचे दहावीच्या परीक्षेत समान गुण , खेडभोसे आजोळात नातेवाईकामध्ये यश संपादन केल्याबद्दल आनंदी आनंद

करकंब आदर्श प्रशालेच्या तेजश्री व तृप्ती नागणे या जुळ्या बहिणीचे दहावीच्या परीक्षेत समान गुण ,  खेडभोसे आजोळात नातेवाईकामध्ये यश संपादन केल्याबद्दल आनंदी आनंद

------------------------------------------------------------------------------------

करकंब( दै.पंढरी नगरी न्यूज ) आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथील करकंबमधील एस.एस.सी. परीक्षेत तेजश्री व तृप्ती सुरेश नागणे या जुळ्या बहिणीनी (93 टक्के) समान गुण घेत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

आदर्श प्रशालेचा निकाल 98.78टक्के लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक कुमारी तेजश्री सुरेश नागणे 93 टक्के व कुमारी तृप्ती सुरेश नागणे 93 टक्के, प्रशालेतील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी 82 विद्यार्थ्यांपैकी विशेष योग्यता प्राप्त 31 व प्रथम श्रेणी प्राप्त 31 तर द्वितीय श्रेणी प्राप्त 19 आले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी बंडू पवार ,रूषिकेश पाटील तिचे आजी - आजोबा व आई वडील यांनी अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.