श्री .संत दामाजी शुगरचे संस्थापक चेअरमन स्व.किसनलाल मर्दा यांचे पुण्यतिथीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रमाचे आयोजन

श्री .संत दामाजी शुगरचे संस्थापक चेअरमन स्व.किसनलाल मर्दा यांचे पुण्यतिथीनिमीत्त कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रमाचे आयोजन

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्याचे लोकनेते, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक- चेअरमन स्व.किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांचे १६ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दि.२९/५/२०२४ कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असुन सकाळी ९।०० वाजता स्व.मारवाडी वकिलसाहेब यांचे प्रतिमेचे पुजन व कारखाना परिसरातील स्व.मारवाडी वकिलसाहेब व स्व.रतनचंद शहा- शेठजी यांचे पुतळयांचे पुजन धनश्री परिवाराचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन ऍड नंदकुमार पवार,जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन रामचंद्र वाकडे, माजी संचालक यादाप्पा माळी यांचे शुभहस्ते होणार असलेचे कारखान्याचे विद्यमान चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगीतले.  

पुण्यतिथीच्या निमीत्ताने ह.भ.प.माधव यादव महाराज मारापुर यांचे गुरुदत्त भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, ह.भ.प. तानाजी मदने महाराज पुळुजवाडी,पांडुरंग गवळी महाराज भालेवाडी, ह.भ.प.नंदकुमार तोंडसे महाराज व दादासाहेब मेटकरी महाराज फटेवाडी यांचा भारुडांचा कार्यक्रम होणार असलेची माहिती व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी दिली.

तसेच दुपारी १२।०० वाजता पुष्पवृष्टी होवुन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असलेची माहिती कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली. तरी पुण्यतिथी निमित्त होणाÅया कार्यक्रमास मंगळवेढा तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.