धर्मदाय चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सोलापुरात उत्साहात उद्घाटन..

धर्मदाय चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सोलापुरात उत्साहात उद्घाटन..

-----------------------------------------------------------------------------------
टेनिस बॉल विजेता संघ ठरला जिल्हा परिषद सोलापूर...
-----------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवडक संघासाठी सोलापूर येथे शासकीय तंत्रज्ञान मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या धर्मदाय चषक सन २०२३ या एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने करण्यात आले ,या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी तसेच प्रतिनियुक्त न्यायाधीश पुतळा यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना धर्मदाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी म्हणाल्या की, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाज करताना ताणतणाव सहन करावा लागतो त्यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्पर्धे त भाग घेऊन मैदानात उतरले पाहिजे व दररोज व्यायाम केला पाहिजे योगासने केली पाहिजेत असे स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या, या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील सत्यजित कुमठेकर, विनोद कांबळे, अमोल सोनवणे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय बुरले, तसेच कुचन प्रशालेतील नबीलाल पटेल यांनी परिश्रम घेतले.