पंढरपुरात राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पाककला स्पर्धेतून आहाराबाबत जनजागृती.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर ,(दै.पंढरी नगरी न्यूज):- राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त आरोग्य सुधारणा व निरोगी आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे.वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सुडके यांच्या अध्यक्षतेखाली पाककला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
सध्या सर्वत्र जीवनसत्त्व अ , जीवनसत्त्व ब 12 व कॅल्शियम या घटकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने पोषणाबाबत जागरूकता वाढवणे या उपक्रमाचा उद्देश असून, सदर स्पर्धेत जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब 12, कॅल्शियम युक्त पदार्थ असा विषय देण्यात आला होता . सहभागी स्पर्धकांनी नाविण्यापूर्ण विविध पदार्ध बनवून आणले होते.
सदा स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम. जयश्री जगताप. द्वितीय क्रमांक श्रीम. शितल रावळे , तृतीय क्रमांक श्रीम. कोमल एतवाडे तसेच उत्तेजनार्थ श्रीम. आरती बनकर यांनी नंबर पटकावला. ब्रदर गजानन कपाटे यांचा स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला .
स्पर्धेमधे डॉ ऋचा वैद्य मॅडम यांनी परीक्षण केले. स्पर्धेचे आयोजन सहायक अधिसेविका श्रीम. सिंधुताई लवाटे, आहारतज्ञ अनुराधा वाघमारे व आहारतज्ञ अमृता भातलवंडे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. मंगल करचे यांनी केले . तसेच राठोड यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत केली .