सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांचे बार्शी शहर व तालुक्यात अवैद्य व्यवसायावर सर्जिकल स्ट्राइक. ◾जुगार अडा, स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक मानवी व्यापार (वैश्या व्यवासय) आणि अवैध गुटखा विक्री सह अवैध धंदयाविरूध्द कारवाई.
-----------------------------------------------------------------------
सोलापूर (दै. पंढरी नगरी न्युज) सोलापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना बार्शी शहर व बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत जुगार, वैश्या व्यवसाय चालु असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करण्या करीता स्वतः पोलीस अधीक्षक, अतुल वि. कुलकर्णी यांनी सहभाग घेवून सोबत श्रीमती अंजना कृष्णा, ASP करमाळा, पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, वाचक अनिल सनगल्ले, A.H.T.U. चे सपोनि श्वेता चव्हाण असे अधिकारी व अंमलदार यांचे पथके तयार करून त्यांना सुचना व मार्गदर्शन करून स्वतः सहभागी होवून कारवाई केली आहे.
<span;>> </span;>बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक मानवी व्यापार (वैश्या व्यवसाय) संदर्भात 02 ठिकाणी कारवाई करून स्पा सेंटर चालक व मालक यांच्यावर कारवाई करून पिडीत महिलांची सटका
वाशी शहर हद्दीतील बार्शी लातूर बायपास रोडवरील द मूनलाईट स्पा येथे कारवाई करण्यात ओली आहे. द मूनलाईट स्पा सेटर येथे दिपक गव्हाणे, व पृथ्वीराज घोडके, केतन प्रकाश धामणेकर, रा. बाशी यांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास मॅनेजर म्हणुन ठेवून सर्वानि संगनमत करून सदर स्पा सेंटर कुटणखान्याप्रमाणे वापरून पिडीत महिला यांना पैश्याचे आमिष दाखवून स्पा सेंटरव्दारे त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय चालत असल्याचे मिळून आले आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे हददीत बार्शी बायपास रोडवरील मौजे नागोबाचीवाडी शिवारातील डिलक्स स्पा येथे करण्यात आलेली आहे. या प्रकरणी सेंटरचे व्यवस्पाक आसलेले बाबाभाई खाजाबाई चौधरी आणि मालक आकाश काशिद यांनी संगनमत करून करून सदर स्पा सेंटर कुटणखान्याप्रमाणे वापरून पिडीत महिला यांना पैश्याचे आमिष दाखवून स्पा सेंटरव्दारे त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय चालत असल्याचे मिळुन आले आहे.
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन दोन्ही गुन्हयाचा तपास हा पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक, महादेव चव्हाण हे करत असुन त्यामध्ये आनखी कोणी आरोपी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निष्पन्न आरोपीतांना मदत करतो काय याबाबत तपास चालु आहे.
<span;>> </span;>बार्शी शहर हद्दीतील अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्यावर कारवाई करून 03 गुन्हे दाखल, 4,20,103/-(चार लाख विस हजार एकशे तीन किमतीचा मुद्देमाल जप्त
बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बार्शीतील सुभाष नगर जावळे प्लॉट येथे एका बंद घरामध्ये कल्याण नावाचे पैश्यावर पैज लावून मटका खेळत असल्याबाबत माहिती प्राप्त होती, सदर ठिकाणाची पडताणी करून प्रदिप वाघमारे, सचिन नगरे, रामचद्रं पवार, बलराम जाधव, रवि खळदगे, रविंद्र मदने, सचिन सामदळे, अमोल वायचळ, आनंद गिरी, अक्षय गिरी, दिनेश पवार, विनोद उमाटे हे बंद घरामध्ये कल्याण मटका खेळत असताना मिळुन आले. त्यांच्या ताब्यातून 3,14,400/- रू किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, व वाहने जप्त जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळुन आला असुन त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी शहर पोलीस ठाणे हददीतील पोस्ट चौक परिसरात दत्तात्रय संतोष गंधे, बालाजी राजाराम सुतार, शरीफ गुलाब तांबोळी, बापू दगडू गुळवे, कर्ण सोमनाथ इंगळे, आणि सतीश सुभाष नगवण हे सर्वजन कल्याण मटका खेळत असताना मिळुन आल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून 84,873/- रू किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
बाशी शहर पोलीस ठाणे हददीतील लता टॉकिज जवळील रोन पान शॉपच्या आडोशाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून कल्याण मटका जुगार घेत असल्याचे इसम नामे सतीश तुकाराम माने, रा. लोकमान्य चाळ, जामगाव रोड, बाशी हा मिळून आल्याने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 20,830/- रू किमतीचे मुददेमाल जप्त करण्यात आले आहे.
<span;>> </span;>प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या विक्रीवरील कारवाई
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हददीत मौजे खांडवी येथील बाशी कुडूवाडी रस्त्यालगत बसस्थानकाजवळ असलेले शिवसाक्षी पान टपरीवर प्रतिबंधीत असलेले गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहितीन्वये सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला असता सदर टपरीमध्ये 27,104/- रू किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदरची कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांना माहिती देण्यात आलेली असून त्याबाबत कारवाई चालु आहे.
<span;>> </span;>सार्वजणीक ठिकाणी गोंधळ व मद्यप्राशन कारवाई
बार्शी तालुका पोलीस ठाणे हददीत काही इसम हे सार्वजणीक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालत असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस स्टाफ जावून त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची मद्यप्राशनाची चाचणी केली करून 03 इसमा विरूध्द माहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) प्रमाणे तसेच 7 इसमा विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे,
सोलापूर ग्रामीण पोलीस दलामार्फत अवैध व्यवसाया विरूध्द कठोर कारवाई सुरू असुन यापुढे देखील अशाच प्रकारचे कठोर कारवाई करून आरोपीता विरूध्द MPDA हद्दपार सारखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक, अतुल वि. कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, यांच्या नेतृत्वात व मार्गदशनात श्रीमती अंजना कृष्णा व्ही. एस. ASP करमाळा विभाग, तसेच पोलीस अधीक्षक यांचे वाचक श्री. अनिल सनगल्ले, पोकों धरेप्पा होनमोरे, पोकों प्रशांत जाधव, मपोकों श्रीदेवी प्रचंडे, मपोकों विद्या राऊत, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक, महादेव चव्हाण, मपोसई श्वेता चव्हाण, पो.उप.नि. रेवणसिध्द काळे, मसपोफौ शारदा घोळवे, पोहेकों सुर्यकांत जाधव, पोहेकों प्रविण वाळके, पोहेकों लक्ष्मण राठोड, मपोकों प्रिती पाटील, चा. होमगार्ड रविंद्र जाधव, तसेच मा. पोलीस अधीक्षक यांचे अंगरक्षक, पोकों सुनिल बोंधमवाढ, व चालक चपोहेकॉ शिंदे, पोलीस मुख्यालय कडील 2 QRT चे पथक व 01 RCP पथक यांच्या संयुक्तरित्या कारवाई केली आहे.