मुस्लिम शिक्षकाचा अनोखा उपक्रम... ◼️ मुलीच्या लग्न पत्रिकेतून 'शिवविवाहचा' सामाजिक एकतेचा संदेश ◼️ त्या अवलिया शिक्षकाच्या सामाजिक उपक्रमाची सबंध महाराष्ट्रभर चर्चेला उधाण, चर्चेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला
------------------------------------------------------------------------------------
बुलढाणा :(दै.पंढरी नगरी न्यूज) आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणामध्ये एकीचे संदेश देणाऱ्या घटना क्वचितच पहावयास मिळतात.. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील इसोली आणि चिखली परिसरात एका मुस्लिम शिक्षकाने आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून सामाजिक एकतेचा आणि सालोख्याचा सुंदर असा संदेश दिला आहे. ही पत्रिका संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरत असून सामाजिक सालोखा, सामाजिक ऐक्य, आणि बंधुता , एकात्मतेचा सुंदर असा संदेश यातून दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेख चांद गुलाब हे पदवीधर शिक्षक आहेत. त्यांची कन्या नेहा अंजुम हिचा विवाह शुक्रवारी 27 मार्च रोजी संपन्न होत आहे. मुलीच्या विवाह निमित्त छापण्यात आलेल्या लग्नपत्रिकेत पारंपारिक पद्धती ऐवजी शिवविवाह सोहळ्याचे आकर्षक चित्रण असलेली लग्नपत्रिका यावेळी त्यांनी छापलेली आहे. ही पत्रिका संपूर्ण राज्यभरात आकर्षण ठरत आहे. बंधूता, एकता, आणि समतेचा संदेश यातून दिला जात आहे. शेख चांद गुलाब यांनी आपल्या मुलीच्या लग्नाकरिता छापलेल्या पत्रिकेत पुढील दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, यांची प्रतिमा आहे. तर लग्नपत्रिकेच्या आतील भागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख यांच्या प्रतिमा तसेच हिंदू संस्कृतीतील शुभ चिन्हांचा आणि राजमुद्रांचा वापर या पत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील या मुस्लिम बांधवाच्या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका सध्या आकर्षण ठरत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे या लग्न पत्रिकेत केवळ विवाहाची माहिती नसून 'लघु आदर्श' या माध्यमातून सामाजिक ऐक्य, भारतीय संस्कृतीचा आदर, मानवता, बंधुता, आणि समतेचा संदेश देण्यात आला आहे. दोन भिन्न धर्मातील परंपरा एकत्र आणत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा हा प्रयत्न पदवीधर शिक्षक शेख चांद गुलाब यांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यांच्या या पत्रिकेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
या उपक्रमामुळे परिसरात पत्रिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांच्या या विचारांचे कौतुक केले आहे. जात, धर्म, वेगळे असले तरी संस्कृती आणि माणुसकी एकच असते. हा संदेश या लग्न पत्रिकेतून अधोरेखित केला जात आहे.
नेहा अंजुमचा विवाह सोहळा 27 मार्च रोजी चिखली येथील राजवाडा लॉन्स येथे सायंकाळी 7:30 च्या दरम्यान संपन्न होत आहे.
समता, बंधुता, एकता, आणि मानवता, तसेच सामाजिक ऐक्य आणि संस्कृतीची ओळख करून देणारा हा विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी संपन्न होत असून या पत्रिकेची आणि या विवाह सोहळ्याची सर्व स्तरातून चर्चा केली जात आहे.