ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांना स्वामी समर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर.... ◼️ पंढरपूरात सोमवारी दि .2 रोजी पुरस्काराचे वितरण

ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांना स्वामी समर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर....  ◼️ पंढरपूरात  सोमवारी दि .2 रोजी  पुरस्काराचे वितरण

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर ( दै पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथील स्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा स्वामी समर्थ जीवन गौरव पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांना जाहीर झाला आहे. स्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान पंढरपूर मार्फत दरवर्षी सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक ,सहकार, शैक्षणिक, उद्योग, कला ,महिला सबलीकरण ,देशसेवा, कृषी ग्रंथालय चळवळीत मोठे योगदान इ. क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे मार्गदर्शक ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या कार्याची दखल घेऊन स्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेने ग्रंथमित्र मोरे यांची या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे .या निवडीचे राज्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रंथ मित्र मोरे यांचे व्हाट्सअप ,फोनद्वारे, प्रत्यक्ष अभिनंदन होत असून निवडीचे सर्व क्षेत्रात स्वागत केले जात आहे.