श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीस सुब्रमणिया शर्मा यांची ५ लाख रुपयांची देणगी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) - श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे सुब्रमणिया शर्मा, रा. कोईम्बतूर (तामिळनाडू) यांनी भक्तीभावाने रु. ५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच लाख) इतकी देणगी अर्पण केली आहे. सदर देणगी समितीकडे स्वीकारण्यात आली आहे.
या प्रसंगी देणगीदार सुब्रमणिया शर्मा यांचा सत्कार मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आला. मंदिराच्या पवित्र कार्यासाठी दिलेल्या या उदार देणगीबद्दल मंदिर समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.