बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात विविध उपक्रमाने जयंती व वाचन दिन साजरा....
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज) : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात थोर शास्त्रज्ञ,भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार,सतीश पाचकुडवे,हौसी कलाकार ग्रुपचे गायक सुनिल फल्ले,विलास नेटके,प्रेम अग्रवाल,प्रेम लोंढे यांचेसह सभासद व वाचक उपस्थित होते.यावेळी डॉ.कलाम यांचे प्रतिमेसमोर ग्रंथालयात उपलब्ध असणारे कलामांचे समग्र साहित्य माहितीसाठी ठेवण्यासाठी आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.