नवरात्र महोत्सव : रूक्मिणी मातेस पारंपारिक देहुडा चरण पोशाखासह सह अलंकार परिधान
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात सुरु झालेली आहे, माता रुक्मिणीला देहुडा चरण पोषाखासह पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
श्री विठ्ठलास पारंपारिक पोशाख परिधान करण्यात आलेला आहे. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, मस्त्य जोड, सूर्य, जडावाचा तारवड जोड, जडावाचे बाजूबंद जोड, शिंदे हार २ पदरी, मोत्याचा तुरा, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, बाजीराव गरसोळी, पाचूची गरसोळी, रूळ जोड, तोडे जोड, कलमाडी बाजूबंद जोड, ठुशी, तुळशीची माळ १ पदरी. इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.