पंढरपूर शाखा मराठा सेवा संघाचे कर्तव्यनिष्ठ सेवा नामांकित पुरस्कार जाहीर ◼️ खासदार- प्रणिती शिंदे ,आमदार अभिजीत पाटील ,आमदार समाधान आवताडे कार्यक्रमास खास उपस्थीती.. ◼️ पूजा आवताडे मॅडम, उपअधीक्षकसो. अभिलेख कार्यालय , सुधाकर (महाराज) घोडके , सेवक (विठ्ठल- मंदिर पंढरपूर) यांचा प्रामुख्याने समावेश.. ◼️ रविवारी दि.14 सप्टेंबर 2025 रोजी भरगच्च कार्यक्रमात पुरस्कार देऊन होणार सन्मान.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सन - २०२५ सालातील विविध क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार समितीने पत्रकाद्वारे दिली .
पंढरपूर मराठा सेवा संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे नामांकित व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठा सेवा संघाचे कर्तव्यनिष्ठ सेवा नामांकित पुरस्कार दिले जातात.
रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी पंढरपूर मराठा सेवा संघ वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिता शिंदे तसेच पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते मराठा सेवा संघ संघाचे कर्तव्यनिष्ठ पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर- माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, गोपाळपूर स्वेरीचे प्रमुख संस्थापक डॉ. बी .पी रोंगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष ह .जा .भोसले (गुरुजी) हे आहेत. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमित निमकर, पुणे येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या राज्य संघटिका सुमनताई पवार, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक संतोष जगताप इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कारांचा भरगच्च जंगी कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पंढरपूर मराठा सेवा संघाचे तालुकाअध्यक्ष नितीन जाधव सर , कार्याध्यक्ष एम .एन. गायकवाड ,सचिव नितीन आसबे इ .पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कर्तव्यनिष्ठ पुरस्कार मिळालेले मान्यवर खालील प्रमाणे :- सुधाकर भीमराव घोडके (सेवक श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर), श्रीकांत भास्कर चव्हाण (संचालक सोहम कृषी सेवा केंद्र बाभुळगांव) ,स्वप्निल वाडेकर (पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण ),सतीश चंद्रकांत बागल (उपसंपादक दैनिक पुण्यनगरी) , हनुमंत भीमराव निंबाळकर (पोस्ट ऑफिस कार्यालय पंढरपूर ),योगेश बंडू आटकळे (सिविल इंजिनिअर), किरण सहदेव चव्हाण (सहाय्यक कृषी कृषी अधिकारी पंढरपूर), आदर्श शिक्षक विष्णुपंत गावडे ,गुरुजी (जि. प .प्राथमिक शाळा .तावशी), वंदना विजयकुमार जाधव (वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती पंढरपूर ),अनिल मच्छिंद्र बागल (तलाठी) ग्राममहसूल अधिकारी कासेगाव), पुरुषोत्तम नामदेव कदम (समूपदेशक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर), पूजा विठ्ठल आवताडे (उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पंढरपूर ) वैभव दगडू चिपडे ( औषध अधिकारी आरोग्य विभाग रोपळे) ,डॉ. अमित ए. इनामदार (नरसिंग दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी), निलेश सूर्यकांत रोंगे (पोलीस हवालदार ),विजय बाळासाहेब पाटील (कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ पंढरपूर) इत्यादी सर्वच मान्यवरांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यामध्ये पंढरपूर नगरपालिकेचे मा. नगरसेवक किरणराज घाडगे यांची केंद्रीय कार्यकारणी सदस्यपदी तसेच संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब बागल यांची निवड झाल्याबद्दल यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण टी .पी .ओ सेमिनार हॉल तळमजला मुख्य इमारत स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे सकाळी १०/३० वा .होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी मस्के, सुभाष तनमोर, एम .एन .गायकवाड, सतीश रकटे, नितीन आसबे, भरतरी विधाते, नितीन पाटील गुरुजी ,मकरंद रणदिवे, गजेंद्र भालके गुरुजी, रवींद्र देशमुख गुरुजी, विद्याधर भोसले, प्रफुल्लकुमार गोडसे, रा .रा भोसले हे अथक परिश्रम घेत आहेत.