श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात गणेश मूर्तीची भक्तिमय वातावरणात स्थापना मंदिर समितीचे लेखा अधिकारी मुकेश आणे सपत्नीक गणेश पूजा संपन्न....

श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात गणेश मूर्तीची भक्तिमय वातावरणात स्थापना  मंदिर समितीचे लेखा अधिकारी मुकेश आणे सपत्नीक गणेश पूजा संपन्न....

------------------------------------------------------------------------------------ 

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंगलप्रसंगी समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला.

गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, तसेच मंदिरे समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार व धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.

समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविक, नागरिक आणि भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री गणरायांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

गणेशोत्सव काळात श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.