पंढरपूर नगरपरिषदे वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सन 2025 हे वर्ष सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती म्हणून साजरी करणार :-- मुख्य अधिकारी महेश रोकडे

पंढरपूर नगरपरिषदे वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सन 2025 हे वर्ष सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती म्हणून साजरी करणार :-- मुख्य अधिकारी महेश रोकडे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) गोकुळ अष्टमी१५ ऑगस्ट 2025 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची 750 वी जयंती मोठ्या भक्ती भवाने उत्साहत साजरी करण्यात येत असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी महेश रोकडे यांनी दिली .

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय आदेशाने प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे शासनाच्या वतीने प्रत्येक सहकारी, खाजगी संस्थेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती सन -2025 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी म्हणून साजरा करण्यात यावा या अनुषंगाने पंढरपूर नगरपरिषदेकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा / मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

यानिमित्त शहरातील वारकरी, फडकरी तसेच शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, विविध मठांचे मठाधिपती , शाळांमधील विद्यार्थी,नगरपरिषद कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक यांचे सह शहरातून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी नगर प्रदक्षिणा टाळ मृदंगाच्या घोषात भजन व हरिनाम जप घेत करण्याचे नियोजन आले आहे .

सदर दिंडी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मठ नाथ चौक येथून सायंकाळी 5 वा. निघणार आहे. तरी सदर दिंडीमध्ये पंढरपूर शहरातील जास्तीत जास्त लहान थोर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.