मा. मोदी गुरुजींच्या शाळेत नवोदयचे विद्यार्थी सहभागी
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंतप्रधान मोदीजींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रम तालकटोरा, नवी दिल्ली येथून शुक्रवार दिनांक २७/०१/२०२३ रोजी प्रसारण करण्यात आला. या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनाही लाईव्ह दाखविण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये नवोदय विद्यालयातील शिक्षक, पालक व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदीजी यांनी परीक्षा देताना कशा पद्धतीने द्यावी या संदर्भात नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला .यावेळी माननीय मोदीजींना विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले. अभ्यास कसा करावा? अवघड विषयाची तयारी कशी करावी? अधिकाधिक भाषा कशा शिकाव्यात ? परीक्षेत कॉपी अनिष्ट प्रकार होतो ? अभ्यासाची सुरुवात कशी करावी? कोणत्या विषयापासून सुरुवात करावी? यासंदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले.
त्यावेळी माननीय मोदीजी यांनी अतिशय समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना उत्तरे दिली. म्हणाले की, स्वतःला कधी कमी समजू नका, स्वतःची क्षमता ओळखा ,आईकडून वेळेचे नियोजन करा , कॉपी याअनिष्ट प्रकाराकडे दुर्लक्ष करा ,सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा. जीवनभर आपणास परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे खचून न जाता आत्मविश्वास वाढवा असे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदीजी यांनी पालक व शिक्षकांची ही संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री सी. एस. गोमारे यांनी प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली केले.