बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान समारंभ सोहळा उत्साहात संपन्न...

बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान समारंभ सोहळा उत्साहात संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै, पंढरी नगरी न्युज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे बी एड, बी पी एड, एम एड व एम पी एड द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींचा शुभेच्छा प्रदान समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे होते.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. व्ही पी शिखरे, डॉ. ए जी कांबळे, डॉ .एस एम लांडगे आदी उपस्थित होते.

यानिमित्ताने प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव विशद केले. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून सहभागी झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कॉलेजमधील मानवी व भौतिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. विविध उपक्रम व प्रात्यक्षिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे प्रशांत कोल्हे यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सद्यस्थितीत शिक्षक पेशात अनेक आव्हाने आहेत. यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहा. शिस्त, वक्तशीरपणा व मूल्ये अंगी जोपासा. सामाजिक भान ठेवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करा असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी प्रशिक्षणार्थींना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आनंदी जीवन जगा.ताण तणावातून बाहेर पडा.स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हा. समाजाला आदर्श असे नागरिक शिक्षणातून घडवा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक डॉ .व्ही पी शिखरे यांनी केले. प्रा. एस ए सावळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. आर ए फुरडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एम व्ही मते यांनी प्रमाणपत्र वितरण केले.डॉ. एम एस डिसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ पी ए पाटील आणि डॉ. एल आय राठोड यांनी सूत्रसंचालन केले.