धक्कादायक ! कासेगावात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; ◼️ आषाढी एकादशीच्या दिवशी घटना, या आत्महत्येमुळे कासेगावावर शोककळा पसरली

धक्कादायक !   कासेगावात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या;  ◼️ आषाढी एकादशीच्या दिवशी घटना, या आत्महत्येमुळे कासेगावावर शोककळा पसरली

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आला .विशेष म्हणजे आईने आपल्या दोन मुलासह रविवारी ६ जुलै २०२५ रोजी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आज सोमवारी दि. ७ जुलैला रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याने कासेगावत खळबळ उडाली आहे.

एकीकडे राज्यात आषाढी एकादशीचा उत्सव सुरु असतानाच दुसरीकडे या दिवशीच पंढरपुरात मोठा उत्साह असताना आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले असतानाच पंढरपूर तालुक्यातील कासेगावात एकाच कुटुंबातील चौघांनी घराशेजारील जवळच असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

◼️ घरगुती कलहातून दुर्दैवी घटना घडली

कासेगावात घरगुती वादातून काल रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार उघडकीस येताच मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस पोहचले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे.

◼️ आधी पत्नी मुलांची नंतर पतीची आत्महत्या

कासेगावात मोनाली म्हमाजी आसबे यांनी ऐश्वर्या व कार्तिक या दोन‌ मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, हा प्रकार रविवारी घडला, दरम्यान ही घटना समजताच पती म्हमाजी आसबे यांनीही आज सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

◼️ घटनेने कासेगाव परिसरात हळहळ

एकाच कुटुंबाील चौघांनी आपले आयुष्य संपवले, या प्रकाराने पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुळ कारण नेमके काय आहे हेही पोलिस तपास करीत आहेत.