खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील 65 एकरातील विविध ठिकाणी भेट ◼️ पंढरपूर आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सुविधा पुरवण्यास शासकीय यंत्रणानी सज्ज राहावे प्रशासनाला सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील 65 एकरातील  विविध ठिकाणी भेट    ◼️ पंढरपूर आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सुविधा पुरवण्यास शासकीय यंत्रणानी सज्ज राहावे प्रशासनाला सूचना

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरा आहे. या वारीत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो किलोमीटर चालत व इतर मार्गाने पंढरपुरात येतात असा हा भक्ती आणि समर्पणाचा आषाढी वारी सोहळा जवळ आला असून या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्यासह अन्य पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो वारकरी भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येत असतात.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदर प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर तालुक्याचा दौरा करून ६५ एकर वारकरी निवास व्यवस्था, चंद्रभागा नदी व वाळवंट, श्री. विठ्ठल दर्शन रांग व्यवस्था, वाखरी पालखी तळ, उपजिल्हा रुग्णालय यासह इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांग, पालखी मार्गावर, तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शौचालय, अखंडित वीजपुरवठा, टँकर, आपत्कालीन केंद्रे, नदीपात्राची स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पूरजन्य परिस्थिती यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच वारी कालावधीत प्रत्येक विभागाला देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या.

यावेळी कार्यरत असणारे महसूल विभाग, नगरपालिका विभागातील अधिकाऱी, कर्मचारी यांनी प्रशासनामार्फत 65 एकरातील भाविकांना देण्यात आलेल्या सुख सुविधांची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांना सांगितली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील यात्रा सोहळ्यातील सहभागी झालेल्या वारकऱ्या सोबत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुख - सुविधा विषयी चर्चा केली .

यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक किरण घाडगे, अमर सुर्यांवंशी, माजी नगरसेवक प्रशांत शिंदे, सतीश शिंदे, संग्राम गायकवाड, संदीप शिंदे, समीर कोळी, मिलींद अढवळकर, नागेश गंगेकर, मामा फलटणकर, राजू उराडे, बाळू आसबे, व्यंकटेश कुलकर्णी, धनंजय काकडे, देवानंद इरकल, दत्तात्रय बडवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.