श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास 2 लाख रुपयांची देणगी,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ):- श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीस बाळासाहेब रामदास कोरडे, अहिल्यानगर यांनी 2 लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीचे कर्मचारी योगेश कागदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेची प्रतिमा, उपरणे, दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.
देणगीदार यांनी यमुनाबाई शामराव गांगर्डे यांच्या स्मरणार्थ सदरची देणगी दिली आहे. गांगर्डे या शेतकरी कुटुंबातील व श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या निस्सिम भक्त होत्या. त्यांनी 60 वर्षे पंढरपूरची पायी वारी केली होती व प्रत्येक वर्षी कार्तिकी एकादशीला अन्नदान करत होत्या. त्यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी मोठी देणगी देण्याची इच्छा होती. त्यांची इच्छा नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब कोरडे, रामकिशन दरेकर, मंदाबाई शिंदे या नातेवाईकांनी पूर्ण केली आहे.
सद्यस्थितीत, चैत्री यात्रेचा कालावधी सुरू असून, भाविकांची गर्दी वाढत आहे. देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS, संकेतस्थळ, मोबाईल ॲप ची सुविधा उपलब्ध असून, देणगीसाठी इच्छुक भाविकांनी श्री संत तुकाराम भवन येथील कार्यालयास संपर्क साधावा असे विभाग प्रमुख राजेश पिटले यांनी सांगितले.