मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी परिचारक कुटुंबियांची घेतली सांत्वन पर भेट..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी परिचारक कुटुंबियांची घेतली सांत्वन पर भेट..

___________________________________________________

पंढरपूर (दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) - माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील कै. प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते. तरी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.    

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.