पंढरपूर उपविभागीय अधिकारी सोमवार अन् शुक्रवार नागरिकांना कार्यालयीन वेळेत भेटणार, : -- प्रांतधिकारी सचिन इथापे , पंढरपूरचे प्रांतअधिकारी स्वतः नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेणार. मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील शेतकर्याकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ):- जिल्हयात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर उपविभागातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त कार्यालयीन वेळेत भेटता येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील नागरिक ग्रामीण भागातुन आल्यावर उपविभागीय अधिकारी बैठकीस किंवा गावभेटीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास त्यांची भेट होत नाही. त्यासाठी ही आठवड्यातून दोन वेळेस लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.  

संबंधित वेळेत तक्रारदार नागरिक, अभ्यागत आणि  शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी  निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय कार्यालय पंढरपूर येथे भेट द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी इथापे यांनी केले आहे.