गादेगावच्या वर्षाराणी मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

गादेगावच्या वर्षाराणी मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै पंढरी नगरी न्युज) गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सहशिक्षक वर्षाराणी गणपत मोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला. गेल्या 14 वर्षापासून अविरतपणे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या वर्षा मोरे शिवरत्न पब्लिक स्कूलच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करत आहेत .शिवरत्न पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, एम टी एस परीक्षा ,पी .टी एस परीक्षा, त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून राज्यस्तरीय विधिमंडळ स्पर्धा ,विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रवेश मिळवल्याचा दिसत आहे. यामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये एम बी बी एस ,बी एम एस त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रवेश मिळवला आहे. शिवरत्न पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज पंचकृषीशीतील व तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र बनले असून या संकुलाच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी आपले भवितव्य घडवीत आहेत. या संस्थेच्या जडणघडणीमध्ये संस्थेच्या सचिव व सहशिक्षक वर्षाराणी गणपत मोरे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

यावेळी मनसे शिक्षक सेलचे हाके सर, घोडके सर ,जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रशांत इंगळे, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, संपादक शिवाजीराव शिंदे, कृष्णा मासाळ, संदीप रणवरे , त्याचबरोबर मनसैनिक व शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.