पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारचा जाहीर निषेध पंढरपुरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले , देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील , सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या आदेशाने परवा घडलेल्या
बदलापूर ह्या घटने सारख्या राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात असलेले निष्क्रिय महायुतीचे सरकारचा पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला व करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सागरजी कुंजीर यांना पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी निवेदन देऊन जाहीर निषेध केला त्याप्रसंगी मनोज गांधरे , संजय थिटे , पिंटू लोंढे , अशोक अवताडे ,नवनाथ कोरके , भैया जमदाडे , हनुमंत नाईकनवरे , महादेव गायकवाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.