साखर आयुक्त कार्यालयावर साखर कामगारांचा इशारा मोर्चा...... साखर कामगार बंधूंनो बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांचा इशारा मोर्चा यशस्वी करा.

साखर आयुक्त कार्यालयावर साखर कामगारांचा  इशारा मोर्चा......  साखर कामगार बंधूंनो बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजीचा साखर कामगारांचा इशारा मोर्चा यशस्वी करा.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज )आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या मीटिंगमध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी साखर आयुक्त कार्यालयावर राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी /प्रलंबित मागण्यासाठी इशारा मोर्चा काढण्याचे निश्चित झाले.

याबाबतचे नोटीस / पत्र साखर आयुक्तांना आज देण्यात आले.

साखर आयुक्तांना आज महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष मा. तात्यासाहेब काळे , सरचिटणीस मा.शंकरराव भोसले कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील खजिनदार प्रदिप बनगे साहेब , सचिव राजेंद्र तावरे , संजय मोरबाळे त्याचबरोबर बारामती तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी व माळेगाव कारखान्याचे माजी कामगार संचालक मा. प्रमोद खलाटे दुसरे माजी कामगार संचालक मा. रणसिंग आटोळे यांनी साखर आयुक्तांना इशारा मोर्च्याचे पत्र दिले.

सदर इशारा मोर्चेचे पत्रक सोबत जोडले आहे. 

अशोक बिराजदार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.