शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव. विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न .
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) नुकतीच झालेली बारावी बोर्ड परीक्षा, सीईटी परीक्षा, जेईई व नीट परीक्षा या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गादेगाव शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमध्ये यश मिळवल्यामुळे त्यांचा एमबीबीएस ला जाण्यासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. गेल्या काही दिवसापासून शिवरत्न मधील बरेच विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर यलमार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे हे होते यावेळी पालक प्रतिनिधी मारुती गिड्डे ,डॉक्टर शेवाळे ,साधना मोरे त्याचबरोबर सहशिक्षक वर्षां मोरे ,राजेंद्र मोलाणे, दीपक देशमुख ,संतोष पवार ,नियाज मुलाणी ,शितल बागल, लीना बागल, शीतल मस्के, मसरुद्दीन पटेल,व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना आलेले अनुभव याविषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मत गणपत मोरे यांनी व्यक्त केले.