राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये सोलापूर मुलींच्या संघाला सिल्वर पदक, गादेगावच्या शिवरत्न ज्युनिअर कॉलेजच्या मुलींचा समावेश
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) नुकत्याच बीड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावला सोलापूरच्या संघाला पुण्याच्या संघाने फायनल मध्ये पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला. सोलापूर मुलींच्या संघाला यावेळी दुसरा क्रमांक मिळाला .त्याच बरोबर सोलापूर मुलांच्या संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारली या स्पर्धेमध्ये काही खेळाडूंची देश पातळीवरील संघामध्ये निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होणार असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही खेळाडूंचा समावेश असणार आहे. या सर्व यशस्वी संघाचे डॉजबॉल चे अध्यक्ष लुंगे सर त्याचबरोबर सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुदीप मालप सर, कोच फिरोज पठाण सर, शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव चे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, सचिव वांगी सर यांनी अभिनंदन केले .