वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी' बंडू पवार यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर.( दै.पंढरी नगरी न्यूज ) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी बंडू दिगांबर पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
बंडू दिगांबर पवार हे खेडभोसे येथील रहिवाशी असून ते मीत भाषिक व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. कोरोना काळात त्यांनी अनेक निराधार यांना आधार देवून सामाजिक कार्य केले असून त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देखील मिळाला आहे. पवार यांचे संघटन कौशल्य चांगले असून त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आज अनेक कामगार संघटना त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.बंडू पवार यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यासाठी खेडभोसे गावात चाहत्यानी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती व पंचक्रोशीतही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, आप्पासाहेब नलवडे, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, विकास पवार, प्रताप थोरात , नितिन देवकर उपस्थित होते.