तुळजापूर नवोदय विद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा
------------------------------------------------------------------------------------
तूळजापूर ( पंढरी नगरी न्यूज ) पी .एम . श्री .जवाहर नवोदय विद्यालयात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयातील परिचारिका सुषमा येलकर मॅडम यांनी आजचा हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून का साजरा केला जातो? हे सांगून WHO संघटनेने या दिवसाला केव्हापासून मान्यता दिली सांगून यावर्षीची असणारे आरोग्याच्या संदर्भात असणारी थिम माझे आरोग्य: माझा हक्क यावर आपले विचार व्यक्त केले. कु. संस्कृती शहाजी जाधव वर्ग आठवी या विद्यार्थिनीने आजच्या दिवसाचे महत्व सांगून आपले आरोग्य निरोगी कसे ठेवावे याबाबतीत आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी उत्तम आरोग्य व निरोगी जीवन जगण्यासाठी आपला आहार कसा असावा हे सांगताना म्हणाले की, दररोजच्या आहारात कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ ,अंडी यांचा संतुलित वापर करून भरपूर विश्रांती व दररोज व्यायाम करून व्यसनापासून दूर राहून आपल्या आपले शरीर व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी विद्यालयातील यश पाटील, धनाजी देशमुख ,सुनिता वाघमारे, रवींद्र अलसेट, सुषमा येलकर यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .हरी जाधव (सर )यांनी केले.