तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी..

तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी..

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय तळसंगी ता मंगळवेढा जि सोलापूर या वाचनालयात थोर क्रांतीकारक ज्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुगा अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक  कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पाटील व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तम्मा कानडे यांनी स्वीकारले.

या कार्यक्रमांचे प्रास्ताविक सुभाष सूर्यवंशी यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले.  प्रमुख पाहुण्यांचे हस्ते या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  सर्व उपस्थितांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेला फुले वाहून अभिवादन केले आणि प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाचे आभार प्रभाकर गायकवाड यांनी मानले. या छोट्याशा सांस्कृतिक कार्यक्रमांस खालील प्रमाणे उपस्थित होते.

सर्वश्री तम्मा कानडे,महादराया पाटील, शंकर पाटील, महादेव कोळेकर, भाऊसाहेब कानडे, रावसाहेब कानडे, तुकाराम शिंगाडे, प्रभाकर गायकवाड, आप्पा बिचुकले, आण्णा बिचुकले, दत्तात्रेय पांढरे, रविराज गायकवाड, धुळा पांढरे, विजय म्हारणूर, दादा मेटकरी, भैय्या म्हारणूर, नंदु कारंडे, अर्जुन लवटे, अनिकेत पांढरे, प्रशांत नवले,सुरज गायकवाड, सोहम कारंडे, मिना लवटे, गुणाबाई कारंडे, लताबाई दिवसे, विमलताई बिचुकले आदी मान्यवर उपस्थित होते.