पंढरपूरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी...., पंढरपूर नगरपरिषद व जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेतून विठ्ठल सेवा हा उपक्रम ◾चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानाचा संकल्प
◾चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानाचा संकल्प
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी स्वच्छ पंढरपूर, हरित पंढरपूर या संकल्पनेतून दर बुधवारी स्वच्छतेतून विठ्ठल सेवा घडावी याकरिता पंढरपूर नगरपरिषद व जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या संकल्पनेतून चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर हे देशातील मोठे तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यातून अनेक भाविक भक्त विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज लाखोच्या संख्येने पंढरपुरात येतात त्यानिमित्त परगाहून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पंढरपूर शहरातील व चंद्रभागा वाळवंटातील परिसर स्वच्छ निरोगी दिसावा याकरिता पंढरपूर नगरपरिषद व जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या विचार संकल्पनेतून स्वच्छ पंढरपूर, हरित पंढरपूर दर बुधवारी स्वच्छतेतून विठ्ठल सेवा करण्यासाठी शहरातील शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना तरुण मंडळे इ.दी सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने या स्वच्छता अभियानात स्वयं प्रेरणेने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. पहिले श्रमदान स्वच्छता हीच विठ्ठल सेवा, श्रमदानातून भक्ती सहभागातून स्वच्छता ही संकल्पना आम्ही या संकल्पनेतून राबवत आहोत दि. 7 ऑक्टोबर रोजी ७/३०ते ९/३० या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.