पंढरपुरात आज दोन दिवशीय ग्रंथ प्रेमीसाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन...

पंढरपुरात  आज दोन  दिवशीय ग्रंथ प्रेमीसाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन...

-----------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व पंढरपूर तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात दि. 14 आणि 15 मार्च रोजी सोलापूर ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड (सर )यांनी दिली.

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक यांच्या आदेशानुसार पंढरपुरात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रखुमाई सभागृहात होणाऱ्या या दोन दिवशी उत्साहात ग्रंथदिंडी परिसंवाद कथाकथन कवी संमेलन परिसंवाद अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची आयोजन साहित्यिक प्रेमींना मिळणार आहे.

शनिवार दि. सकाळी 9:30 वा .छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंढरी नगरीच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या हस्ते व पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथनदिंडी मोठ्या उत्साहात निघणार आहे. सकाळी 11 वा .सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रखुमाई सभागृहात ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे .कार्यक्रमास खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते ,पाटील, खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि .प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत दुपारच्या सत्रात 2 वा. डॉ. रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये सार्वजनिक ग्रंथालय व वाचकांची भूमिका या विषयावर परिसंवाद तर 3:30 वा. शिवाजी बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगणार आहे. 5 वा .नटसम्राट हा एकपात्री कार्यक्रम फुलचंद गांगर्डे हे आपले नाट्य सादर करणार आहेत दि. 15 रोजी सकाळी 11 वा. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन तर दुपारी 2 वा. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावर परिसंवाद होणार आहे. दु. 3:30 वाजता ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप होणार आहे, कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा माहिती कार्यालय अधिकारी सुनील सोनटक्के, हरिदास रणदिवे, पद्माकर कुलकर्णी इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथोसोकाळात ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री स्टॉलचे लावण्यात येत आहेत जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाच्या पदाधिकारी , विद्यार्थी, वाचक, यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.