पंढरपूर नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक घरगुती गौरी /गणेश स्पर्धांचे आयोजन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज) "स्वच्छ - सुंदर हरित पंढरपूर" या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव तसेच शहरातील महिला भगिनींसाठी पर्यावरण पूरक घरगुती गौरी सजावट स्पर्धा सन- 2025 आयोजित करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तसेच महिला भगिनींना घरगुती गौरी सजावट यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, या स्पर्धेत सहभागी व्हावे, आणि पर्यावरण-स्वच्छता जनजागृती सोबतच आकर्षक बक्षीसे पंढरपूर शहरातील सर्व घरगुती गौरी तसेच गणेशोत्सव तरुण मंडळाने स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन या कार्यक्रमास शोभा वाढवावी तसेच बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलीस प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
◼️ विजेत्या मंडळांसाठी आकर्षक बक्षिसे
◼️ प्रथम क्रमांक – ₹ 7000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
◼️ द्वितीय क्रमांक – ₹ 5000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
◼️ तृतीय क्रमांक – ₹ 3000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,
◼️ स्पर्धेतील निकष खालीलप्रमाणे -
◼️ पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट ,
◼️ प्लास्टिक आणि थर्माकोल सजावट साहित्य टाकाऊ पासून टिकाऊ ,
◼️ घरगुती कचरा व्यवस्थापन आणि डस्टबिनचा वापर,
तसेच वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता.
वरील मुद्द्याच्या आधारे गुणांकन करून तज्ञ परीक्षकांच्या मार्फत परीक्षण केले जाईल याची स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
नाव नोंदणीची तारीख: 31 ऑगस्ट ते 3सप्टेंबर 2025
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लगेच नाव नोंदणी करिता
सविता देशमुख-8830684385,
अंजली काबुगाडे-8422019033
पवार (पोलीस हवालदार) – 9823990732 यांच्याकडे संपर्क साधावा संपर्क साधण्याचे ठिकाण पंढरपूर नगरपरिषद
कार्यालय: 4075/अ, भादुले चौक, पंढरपूर येथे आपली नावे नोंदवावीत