मंगळवेढा - सांगोला नूतन उपविभागीय कार्यालय पाेलीस आधिकारी म्हणून डॉ.बसवराज शिवपुजे रूजू ◼️ दोन्ही तालुक्यातील पोलीस प्रशासन व नागरिक या सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार :-- डॉ. शिवपुजे
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) :- मंगळवेढा - सांगोला उपविभागीय कार्यालय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. दरम्यान तत्कालीन डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांची बदली रत्नागिरी येथे झाल्याने येथील जागा रिक्त झाली होती.
महाराष्ट्र शासन गृहविभागाने पोलीस खात्यातील अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये विद्यमान डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी श्रीरामपूर येथून डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे हे आले असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
डी.वाय.एस.पी. गायकवाड यांच्या बदलीचा अर्ज प्राप्त होताच ते अन्य बदलीच्या ठिकाणी गेल्याने येथील कार्यभार पंढरपूरचे डी.वाय.एस.पी.प्रशांत डगळे यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुतन डी.वाय.एस.पी.डॉ.शिवपुजे यांच्याकडे दिला.
डी.वाय.एस.पी.डॉ.शिवपुजे यांनी पदभार घेतल्यानंतर डी.वाय.एस.पी. कार्यालयातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेवून कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.डॉ.शिवपुजे हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आत्तापर्यंत गडचिरोली,ठाणे, अकलूज आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे.