पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने हरित वारी उपक्रमांतर्गत 1000 वृक्षांची लागवड ◼️लक्ष्मी टाकळी परिसरात वृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न...

पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने हरित वारी उपक्रमांतर्गत 1000 वृक्षांची लागवड  ◼️लक्ष्मी टाकळी परिसरात वृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस, हरित वारी उपक्रमांतर्गत लक्ष्मी टाकळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर व लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत यांच्या वतीने लक्ष्मी टाकळी शिवारात पहिल्या टप्पात 1000 वृक्षाचे लागवड केली असून एकूण 5000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

वृक्षरोपण कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नाना कदम हनुमंत माने, राजेश पाटील, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर, सहा पोलीस निरीक्षक, विश्वास पाटील,सहा. पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर,सहा. पोलीस निरीक्षक कवितकर पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार, स्वेरी कॉलेज गोपाळपूरचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सरपंच संजय साठे , उपसरपंच सागर कारंडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम 10:00 ते 11:30वेळेत पार पडला . कार्यक्रमास विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.