पंढरपुरातील शिवभक्त प्रतिष्ठानचे 550 कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज समाधी दर्शनासाठी रवाना, कार्यक्रम सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दैनिक ,पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथील शिवपुण्य स्मृती रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन करण्यासाठी क्षेत्र किल्ले रायगड येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिवभक्त प्रतिष्ठानचे संघटनेचे अध्यक्ष व तथा पंढरपुरातील स्टेशन रोडवरील प्रसिद्ध श्रीराम हॉटेलचे मालक श्रीराम गनपुले व शिवभक्त सुधीर ( महाराज )घोडके यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी पंढरपुरातून यावर्षी 550 पंढरपुरातील वारकरी तथा धारकरी यांची श्री शिव समाधी नतमस्तक दुर्ग मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूरचे यंदाचे हे 25 वे वर्ष असून यावर्षी शिवसमाधी नतमस्तक अभिवादन कार्यक्रमास धारकरी व वारकऱ्यांची दिंडी टाळ पताका मृदुंग यांच्या समवेत रवाना झाले . शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने शूरवीरांच्या पराक्रमाची यथोगाथा सांगणारा मर्दानी आखाड्याची चित्त थरारक प्रात्यक्षिके करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहोत .त्याचबरोबर सेक्सोफोन या आधुनिक वाद्यांनी वीरश्री नटलेली व छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्र गीते ही वाजवून एक अनोखी संगीतमय मानवंदना रायगडावर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास पंढरपुरातील आबालवृद्ध बाल महिला सर्वजण एकत्र शिस्तबद्ध पद्धतीने रायगडावर येऊन 11 एप्रिल रोजी गड दर्शन व गड स्वच्छता मोहीम होऊन 12 एप्रिल रोजी श्री शिव पुण्यस्मृती शिवसमाधी नतमस्तक दुर्ग मोहिमेचे औचित्य साधून गडावरील शिरकाई देवी होळीच्या माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा जगदीश्वरातील जगदीश्वराची पूजा महाआरती व शिव समाधीला नतमस्तक होऊन व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर होळीच्या माळावर चित्त थरारक मैदानी आखाडा प्रात्यक्षिकेही करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे .
या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याबरोबर अनेक मंत्रिमंडळातील सहकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला नतमस्तक होणार आहेत.
या कार्यक्रमानंतर पंढरपूरची वारी रायगडच्या द्वारी ही दिंडी श्री क्षेत्र पाचाड येथे जिजाऊ माँ साहेबांच्या समाधीला मानवंदना देऊन पंढरपूरकडे रवाना होणार आहे. असा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे. या कार्यानिमित्त पंढरपुरातील शिवभक्त प्रतिष्ठानला 2018 चा रायगड भूषण पुरस्कार व 07 मार्च 2025 चा तोरणाभूषण पुरस्कार ही प्राप्त झाला आहे .
या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील अनेक शिवभक्त फुल ना फुलाची पाकळी देऊन आपली सेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला अर्पण करतात. असे शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीराम गणपुले व शिवभक्त सुधीर घोडके यांनी सांगितले.