गादेगांवच्या शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न... स्नेहसंमेलनाची परंपरा कायम
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले यामध्ये देशभक्तीपर गीतं, पारंपरिक लोकगीत, त्याचबरोबर विनोदी नाटक अशा विविध प्रकारे आपली कला कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते असे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी सांगितले.
या संमेलनामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील मुला - मुलींनी आपल्या विविध कला सादर केल्या.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती पद्माकर बागल ,माजी सरपंच विकास भोसले, भाजपचे गणेश बागल ,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष हनुमंत बागल, समर्थ पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संजय गवळी ,मनसेच्या अनिल बागल, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, शांतिनाथ बागल व रसिक श्रोते व पालक पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीमध्ये होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक वर्षा मोरे ,शितल मस्के ,लीना बागल ,शितल बागल ,सिमा रकटे, पटेल, दीपक देशमुख ,राजेंद्र मोलाणे, नियाज मुलाणी ,सोमनाथ भूईटे ,अजय मोरे ,नागेश कांबळे ,आदींनी परिश्रम घेतले.