महिला व बालविकास विभागा अंतर्गत राज्यातील ४४ निरिक्षण गृहे / बालगृहातील शिक्षकेतरांना कालबद्ध पदोन्नती योजना तर शिक्षक संवर्गास वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याच्या प्रस्तावास राज्यमंत्री मंडळाची मंजूरी , - ३ वर्षाच्या अथक प्रयत्नाला अखेर यश - शत्रुघ्न कांबळे सर
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज )- राज्यात महिला व बालविकास विभागा अंतर्गत जिल्हा / प्रादेशिक संघटनेमार्फत एकूण ४४ निरिक्षणहे / बालगृहे कार्यरथ असून त्यामध्ये वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून एकाच वेतनश्रेणीत काम करत असल्याने वेतनातील कुंठीतता घालवण्या साठी कर्मचारी संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे सर गेल्या ३ वर्षापासून ही योजना लागू होणे करिता मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर दि . २३ सप्टेंबर २०२४ च्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत या विषयास मान्यता मिळाल्यामुळे ही योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा व थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्याबाबातचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असल्याची माहिती महाराष्ट् निरीक्षण गृह व बालग्रह कर्मचारी संघटनेचे राज्याचे सहसचिव शत्रुघन कांबळे यांनी दिली.
हा एक ऐतिहासिक सोनेरी क्षण आम्ही अनुभवत असताना या निर्णयामुळे कर्मचारी अक्षरशः भारावून गेले असून विविध संस्था मध्ये मुलांना मिष्ठांण्ण देवून कर्मचारी एकमेकाना आलिंगन देवून पेढे भरवून आनंद व्यक्त करित आहेत. या संस्थातीत कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून अनाथ उपेक्षित एकल पालक तसेच विविध छोटया मोठ्या गुन्हयात अडकलेल्या विधिसंघर्ष ग्रस्त बालकांची अविरत सेवा करित आहेत. आता पर्यंत या संस्थेतील कर्मचाऱ्यांना तसे काहीच पदरात पडले नव्हते महिन्याचा पगारही ४ ते ६ महिन्याच्या विलंबाने होत असे . नियमीत वेतनाच्या अनुषंगानेसंघटनेमार्फत संघटनेचे सचिव बादशहा शेख सर व सहसचिव श्री शत्रुघ्न कांबळे सरांनी मा . मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती त्याचाही निकाल नुकताच लागला असून गेल्या दोन महिन्यापासून शासनाकडून दरमहा नियमीत वेतन मिळत आहे . दोन्ही निकाल ऐतिहासीक आहेत या ऐतिहासिक निकालाचे श्रेय राज्यातील ४४ संस्थामधिल आजी माजी कर्मचाऱ्यांना सर्मपित करत असल्याचे संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे सर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे .
या कामाकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषः ,संजय भिसे सर सोलापूर , पद्मजा गारे मॅडम कोल्हापूर , प्रशांत देसले नाशिक , वाडीले सर, सौ गायकवाड मॅडम , जवरे मॅडम , मराठे भिवंडी ,ढाकणे सर , बडे श्रीरामपूर यांचे विशेष सहकार्य लाभले तर संघटनेचे सचिव बादशहा शेख सर पुणे , सल्लागार अवधूत जगताप सर छत्रपती संभाजी नगर, शरणाप्पा मुगळीकर सर सौ देशमुखे मॅडम सोलापूर , मिखीत स्वर्गे ,उगले सर मनमाड , शाम बच्छाव मालेगाव , प्रमोद देवांग सर संगमनेर, पंकज कस्तुरे , सुर्यकांत देशमुख ,संकपाळ सर, कराड बाबु साळुंखे सर. कागल, अशोक वराडे सर पुणे, स्वप्नील शेटे कोल्हापूर, संजय भिसे, संघटनेच्या खजिनदार पद्मजा गारे मॅडम, ढाकणे सर श्रीरामपूर, सांगली निरीक्षण ग्रहाचे दादासाहेब जाधव सर, अनुराधा राजेघोरपडे सातारा यानी सहकार्य केले.
यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयास मंजुरी मिळाल्याबद्दल मुंबई येथे मंत्रालयात महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांचा पेढे , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .असे संघटनेचे सहसचिव शत्रुघ्न कांबळे सर यांनी सांगितले.