पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांची 224 प्रकरणे मंजूर ; तहसीलदार सचिन लंगुटे शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन :- तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांची 224 प्रकरणे मंजूर ; तहसीलदार सचिन लंगुटे  शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन :-   तहसीलदार सचिन लंगुटे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळसेवा निवृत्तीवेतन योजनेखालील जवळपास एकूण 224 प्रकरणे मंजूर झाली असल्याची माहिती पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. या योजनेची एकूण 240 प्रकरणे पंढरपूर तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेला दाखल झाली होती संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाची बैठक तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून या बैठकीत जवळपास एकूण 224 पात्र प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील जवळपास 224 निराधारांना आता जगण्याचा आधार मिळाला आहे .तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली .

यावेळी संजयगांधी निराधार योजने साठी एकूण 144 प्रकरणी मंजूर झाली .त्यापैकी 15 लाभार्थीची प्रकरणे ना मंजूर करण्यात आली तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची 80 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत तर 1 प्रकरण नामंजूर करण्यात आले आहे .संजयगांधी निराधार तसेच श्रावणबाळसेवा निवृत्ती वेतन योजनेतील काही प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत ज्या लाभार्थ्यांची प्रकरणी मंजूर झाली आहेत त्यांनी तातडीने मूळ बँक पासबुक व आवश्यक कागदपत्रासह तहसील कार्यालय संजय गांधी शाखा यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केली आहे. तसेच ज्या ज्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांना त्रुटी लागले आहेत त्यांनी पंधरा दिवसाच्या आत त्या त्रुटीची पूर्तता करावी असेही आवाहन तहसीलदार लंगुटे यांनी केले आहे .

सर्व तालुक्यातील गोरगरीब पात्र लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळसेवा निवृत्ती वेतन योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार लंगुटे यांनी केले आहे. सदर लाभार्थ्यांच्या प्रकरणाचा निपटवारा करण्यासाठी संजय गांधी निराधार शाखा कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार पंडित कोळी, वरिष्ठ लिपिक जगन्नाथ कुंभार, लिपिक मनीषा अंकुशे मॅडम, अर्चना मागाडे मॅडम यांनी सहकार्य केले.