राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष वर्षा शिंदे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला भगिनी मध्ये जल्लोषाचे वातावरण
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै. पंढरी नगरी न्यूज) सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अध्यक्ष वर्षाताई शिंदे यांना यंदाचा अविष्कार फौउंडेशन इंडिया कोल्हापूर या संस्थे मार्फत देण्यात येणारा सन-2024 चा राज्यस्तरीय राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे यांना सन -2024 चा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार निवडीची घोषणा अविष्कार फौउंडेशन संस्थेचे पुणे विभागीय महासचिव संजय घोडके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे . त्याचे मुळगाव वाखरी येथील जिजाऊची लेक सदैव सामाजिक, राजकीय कार्य करत असलेल्या वर्षाताई शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाणे पसंत केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्षा शिंदे यांचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य इत्यादी क्षेत्रात तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप करणे, गोरगरीब, दिनदलित, उपेक्षित समाजासाठी मदत केली.
ग्रामीण भागात तळागाळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना सोलापूर ग्रामीण भागात त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर वर्षा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी म्हणून सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपद दिले परवाच झालेल्या पंढरपुरात 24 लाखाच्या आसपास आषाढी एकादशी सोहळा वारकरी भावीक भक्तांनी भरला होता यात्रेत महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे स्वतः उपस्थित राहून प्रत्येक वारकऱ्यांना मोफत खिचडी वाटप, आरोग्य, पाणी इ.बाबत चौकशी करून त्यांना सर्व सेवा सुविधा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आल्या होत्या या सर्व सामाजिक, राजकीय घटनांची तपशीलवार माहिती घेऊन त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून अविष्कार फौउंडेशन संस्थेने त्यांना राज्यस्तरीय असा नामांकित समजला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा व वैद्यकीय क्षेत्रात गेली 18 वर्षे काम करीत आहे. वर्षाताई शिंदे यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून व महिला भगिनी कडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी पुणे येथे ज्ञानज्योती पुरस्कार यासह अन्य पुरस्कार आणि व्याख्यान इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा हा शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11/00 वाजता पुणे येथील शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे- सातारा रोड, पद्मावती रस्त्यावर विवेकानंद पुतळ्याजवळ येथे सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे पुरस्कार निवड समितीचे महासचिव संजय घोडके यांनी केले आहे.