श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेस भाविकाकडून 05 लाख 40 हजार किंमतीचे चांदी वस्तू अर्पण.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- गुजरात येथील भाविक श्री तेजसकुमार मगनभाई पटेल यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 5 किलो वजनाची चांदी वस्तू अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.5,40,000/- इतकी आहे.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने श्री पटेल यांचा सत्कार मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.