भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी .एस शेट्टी यांनी घेतले श्री विठ्ठल - रूक्मिणी मातेचे दर्शन, ◼️बँकेच्या सीएसआर फंडातून 30 लाख रूपयांची देणगी,

भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी .एस शेट्टी यांनी घेतले श्री विठ्ठल - रूक्मिणी मातेचे दर्शन,  ◼️बँकेच्या सीएसआर फंडातून 30 लाख रूपयांची देणगी,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ):- भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी आज श्री विठ्ठल- रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांनी चेअरमन शेट्टी यांचा श्रींची मुर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.    

याप्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी यांनी मंदिर समितीस बँकेच्या सीएसआर फंडातून 125 केव्हीए क्षमतेचा सोलार प्लॉन्ट उभारणेसाठी 30 लाख रूपयांच्या देणगीचा धनादेश मंदिर समितीस दिला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. 

यावेळी सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, भारतीय स्टेट बँकचे अरविंद कुमार, श्रीराम सिंग, सतिश कुमार, पंकज बर्नवाल, आनंदकुमार पाटकर तसेच पंढरपूर शाखेचे मुख्य प्रबंधक आश्रय दीक्षित व प्रबंधक राहुल गाडेकर उपस्थित होते.