मुलीच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थांना केेले मोफत सायकलींचे वाटप तुंगतच्या महिला सरपंचाचा आदर्शवत उपक्रम
------------------------------------------------------------------------------------
तुंगत ( दै.पंढरी नगरी न्यूज ): ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सातत्याने सामाजिक संस्था पुढाकार घेत असतात यामध्ये विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू असतात. याचाच भाग म्हणून तुंगत गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे यांनीही आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर खर्चिक उपक्रमांना फाटा देऊन स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्याचा आदर्श उपक्रम राबविला आहे. मुलगी वेदिका हिचे वाढदिवसानिमित्त २० सायकलींचे मोफत वाटप करून आदर्श त्यांनी ठेवला आहे.
श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत येथे शिकणार्या आणि शेतातून दररोज चालत येणार्या १० मुली व १० मुले यांना आज मोफत सायकल वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या बाबतीत शहरी भाग ग्रामीण भागाच्या बराचसा पुढे गेलेला आहे , शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांचा अभाव जाणवतो, मुलांचा रोजचा पायी प्रवास यामुळे दररोज एक ते दीड तास वाया जाणारा वेळ सायकल मुळे कमी होऊन सदर वेळ अभ्यासासाठी वापरता येऊन मुलामुलींच्या गुणवत्तेत फरक पडण्यास मदत होईल असा विश्वास सरपंच डॉ अमृता रणदिवे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापिका पुकळे मॅडम, अलका लोहार, महादेव देठे , मंगेश रणदिवे , डॉ आबासाहेब रणदिवे ,उपसरपंच प्रकाश रणदिवे , इंद्रजित रणदिवे, पंकज लामकाने, बतास वनसाळे, अमित साळुंखे, औंदुंबर गायकवाड, धनाजी मोरे , आप्पा रणदिवे, चैतन्य रोकडे , अमोल रणदिवे , ताजुद्दीन मुलाणी, अंगद रणदिवे, नारायण रणदिवे, शिवाजी इंगळे , विश्वनाथ गायकवाड, तसेच शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य आणि श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगतचे सर्व शिक्षक उपस्थित होते.